20 वर्षांनंतर उद्धव-राज ठाकरे एकत्र
जवळपास 20 वर्ष राजकीय दृष्ट्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षण हजारो लोकांनी प्रत्यक्षात डोळ्यात साठवला.त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले.सभेच्या विचार मंचावर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गळाभेट घेतली. या ऐतिहासिक क्षणावर सभागृहात टाळ्या, शिट्या, घोषणा निनादू लागल्या. 19 वर्षानंतर हे दोन्ही नेते एकत्र आल्याचा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावुक झाला.राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर, हा मेळावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह विशेष म्हणजे शेकाप, माकप, भाकप, भाकप माले या डाव्या पक्षांच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती.या पार्श्वभूमीवर ‘मराठी विजय मेळावा’ हे केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून, मराठी अस्मितेचा आणि एकतेचा सशक्त संदेश देणारा क्षण ठरला. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी जमले होते.
Home महत्वाची बातमी 20 वर्षांनंतर उद्धव-राज ठाकरे एकत्र
20 वर्षांनंतर उद्धव-राज ठाकरे एकत्र
जवळपास 20 वर्ष राजकीय दृष्ट्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षण हजारो लोकांनी प्रत्यक्षात डोळ्यात साठवला.
त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले.
सभेच्या विचार मंचावर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गळाभेट घेतली. या ऐतिहासिक क्षणावर सभागृहात टाळ्या, शिट्या, घोषणा निनादू लागल्या. 19 वर्षानंतर हे दोन्ही नेते एकत्र आल्याचा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावुक झाला.
राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर, हा मेळावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह विशेष म्हणजे शेकाप, माकप, भाकप, भाकप माले या डाव्या पक्षांच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती.
या पार्श्वभूमीवर ‘मराठी विजय मेळावा’ हे केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून, मराठी अस्मितेचा आणि एकतेचा सशक्त संदेश देणारा क्षण ठरला. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी जमले होते.