सचिन वालावलकर यांची नियोजन समिती सदस्यपदी निवड
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग
शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीचे लेखी पत्र आज त्यांना प्राप्त झाले.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे सचिन वालावलकर हे वेंगुर्लाचे रहिवासी असून ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतात, प्रशासकीय कामकाजाचा अचूक अभ्यास असलेले सचिन वालावलकर यांनी आपल्या या कौशल्याचा वापर करुन वेंगुर्ला शहराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलल्याचे सर्वज्ञात आहे. मुंबई मंत्रालयातील उच्च अधीकारी वर्गातही त्यांचा चांगला परिचय असून आपल्या या परिचयाचा वापर त्यांनी वेंगुर्लेच्या विकासासाठी करुन दिला आहे. आता त्यांची नियोजन समितीवरही निवड झाल्याने त्यांच्या या अनुभवाचा उपयोग जिल्ल्यातील समस्याही सोडविण्यासाठी निश्चितपणे होईल असे बोलले जात आहे.
Home महत्वाची बातमी सचिन वालावलकर यांची नियोजन समिती सदस्यपदी निवड
सचिन वालावलकर यांची नियोजन समिती सदस्यपदी निवड
प्रतिनिधी सिंधुदुर्ग शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीचे लेखी पत्र आज त्यांना प्राप्त झाले.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे सचिन वालावलकर हे वेंगुर्लाचे रहिवासी असून ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतात, प्रशासकीय कामकाजाचा अचूक अभ्यास असलेले सचिन वालावलकर यांनी आपल्या […]