धवडकी शाळेने राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला तिसरा क्रमांक
बेंगलोर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल विज्ञान स्पर्धेसाठी प्रतिकृतीची निवड
ओटवणे | प्रतिनिधी
बेंगलोर येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ऑनलाईन ‘राष्ट्रीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनात माडखोल धवडकी शाळा नं. २ चा विद्यार्थी कु. श्रेयस वसंत पानोळकर याने सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे सदर प्रतिकृतीची जानेवारी – २०२४ मधे बैंगलोर येथे होणाऱ्या ऑफलाईन इंटरनॅशनल विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या कु . श्रेयस वसंत पानोळकर याच्या ‘प्रदुषणमुक्त सुरक्षित महामार्ग’ या विज्ञान प्रकल्पाची बैंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यानंतर १ व २ डिसेंबरला बैंगलोर वरून या प्रकल्पाचे ऑनलाईन सादरीकरण व मूल्यमापन करण्यात आले होते. या प्रदर्शनात निवड झालेली धवडकी प्राथमिक शाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. या निवडीमुळे या शाळेने उत्तुंग विज्ञान भरारी घेतली आहे. श्रेयसला विज्ञान शिक्षक अरविंद सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयसच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे,शिक्षकवृंद, सर्व शालेय कमिट्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Home महत्वाची बातमी धवडकी शाळेने राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला तिसरा क्रमांक
धवडकी शाळेने राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला तिसरा क्रमांक
बेंगलोर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल विज्ञान स्पर्धेसाठी प्रतिकृतीची निवड ओटवणे | प्रतिनिधी बेंगलोर येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ऑनलाईन ‘राष्ट्रीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनात माडखोल धवडकी शाळा नं. २ चा विद्यार्थी कु. श्रेयस वसंत पानोळकर याने सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे सदर प्रतिकृतीची जानेवारी – २०२४ मधे बैंगलोर येथे होणाऱ्या […]