भावेश, सिमरनप्रित यांचा दुसरा विजय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी येथे सुरू असलेल्या पहिल्या निवड चाचणीत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत आणि सिमरनप्रित कौर यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत विजेतेपद मिळविले.
पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत दुसऱ्या चाचणीमध्ये भावेशने 34 शॉट्स नोंदवित पहिला क्रमांक घेताना अनिश बनवालाला मागे टाकले. बनवालाने पहिल्या निवड चाचणी फेरीत विजेतेपद मिळविले होते. मात्र दुसऱ्या फेरीत अनिशने 29 शॉट्स नोंदविले. विजयवीर सिद्धू 22 शॉट्ससह तिसऱ्या स्थानावर राहिला. महिलांच्या 25 मी. पिस्तुल फायर नेमबाजीत सिमरनप्रित कौरने 37 शॉट्स नोंदवित पहिले स्थान पटकाविले. मनु भाकर दुसऱ्या स्थानावर तर ईशासिंग तिसऱ्या स्थानावर राहिले.& सिमरनप्रितने पहिल्या फेरीत विजेतेपद पटकाविले होते. रिदम सांगवानला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Home महत्वाची बातमी भावेश, सिमरनप्रित यांचा दुसरा विजय
भावेश, सिमरनप्रित यांचा दुसरा विजय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी येथे सुरू असलेल्या पहिल्या निवड चाचणीत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत आणि सिमरनप्रित कौर यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत विजेतेपद मिळविले. पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत दुसऱ्या चाचणीमध्ये भावेशने 34 शॉट्स नोंदवित पहिला क्रमांक घेताना अनिश बनवालाला मागे टाकले. […]