SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या
T20 विश्वचषक स्पर्धेत B गटातील महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना स्कॉटलंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना रविवार, 16 जून रोजी सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. T20 विश्वचषकातील हा 35 वा सामना असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.00 वाजता सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलियाला हरवल्यास स्कॉटलंड सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरेल. अशावेळी गतविजेता इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडेल. स्कॉटलंडचे सध्या तीन सामन्यांतून पाच गुण आहेत आणि जर इंग्लंडने शनिवारी नामिबियाला पराभूत केले तर ते चांगल्या निव्वळ धावगतीने बरोबरी साधतील, परंतु स्कॉटलंडला अजूनही त्यांना मागे टाकण्याची संधी असेल.
यष्टिरक्षक : मॅथ्यू वेड, मॅथ्यू क्रॉस
फलंदाज : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, रिची बेरिंग्टन, जॉर्ज मुनसे, ब्रँडन मॅकमुलेन
अष्टपैलू : ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन
गोलंदाज : मिचेल स्टार्क
कर्णधार : ग्लेन मॅक्सवेल, उपकर्णधार: रिची बेरिंग्टन
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ॲश्टन अगर, जोश हेझलवुड.
स्कॉटलंडचे संभाव्य प्लेइंग 11: जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॉट, क्रिस्टोफर सोल, सफियान शरीफ, ब्रॅड व्हील.
Edited by – Priya Dixit