आजही शाळांना सुटी

बेळगाव-खानापूर तालुक्यातील पीयु कॉलेजना सुटी बेळगाव : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर, बैलहौंगल आणि कित्तूर तालुक्यातील अंगणवाडीसह सर्व सरकारी शाळा, अनुदानित, विनाअनुदानित, माध्यमिक शाळांना तसेच बेळगाव व खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांना दि. 24 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कळविले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुलांच्या हिताच्या दृष्टीने शाळांना दि. 24 जुलै रोजी […]

आजही शाळांना सुटी

बेळगाव-खानापूर तालुक्यातील पीयु कॉलेजना सुटी
बेळगाव : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर, बैलहौंगल आणि कित्तूर तालुक्यातील अंगणवाडीसह सर्व सरकारी शाळा, अनुदानित, विनाअनुदानित, माध्यमिक शाळांना तसेच बेळगाव व खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांना दि. 24 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कळविले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुलांच्या हिताच्या दृष्टीने शाळांना दि. 24 जुलै रोजी सुटी देण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेश जारी केला आहे. चार तालुक्यातील अंगणवाडीसह प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर बेळगाव व खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने या दोन तालुक्यातील शाळांसह पदवीपूर्व महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक, महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करावे, तसेच सुटीचे पुढील काळात नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितले आहे.