‘एसबीआय’ची अमृत-कलश योजना 31 मार्च रोजी संपणार
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व इतरांना 7.10 टक्के वार्षिक व्याजदर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) विशेष मुदत ठेव योजना अमृत कलश या महिन्यात संपत आहे 31 मार्च रोजी. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.60टक्के आणि इतरांना 7.10 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एफडीवर अधिक व्याज हवे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
ही विशेष मुदत ठेव
अमृत कलश ही एक विशेष रिटेल मुदत ठेव आहे. एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के तर सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी करू शकता. अमृत कलश योजनेंतर्गत, दर महिन्याला, प्रत्येक तिमाहीत आणि प्रत्येक सहामाहीत तुम्हाला व्याज दिले जाते.
50 बेस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज
‘एसबीआय वूईकेअर’ योजनेतही गुंतवणूक करता येईल. एसबीआय आणखी एक विशेष मुदत ठेव योजना वूईकेअर देखील चालवत आहे. एसबीआयच्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या ठेवींवर 50 बेस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या रिटेल मुदत ठेवींवर सामान्य लोकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. ‘वी केअर डिपॉझिट’ योजनेअंतर्गत, 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या एफडीवर 1 टक्के व्याज मिळेल. तथापि, मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास कोणतेही अतिरिक्त व्याज दिले जाणार नाही.
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन गुंतवणूक करू शकता
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही बँकेच्या शाखेतही जाऊ शकता. त्याच वेळी, नेट बँकिंग आणि एसबीआय योनो अॅपद्वारे देखील गुंतवणूक केली जाऊ शकते. सामान्य एफडीप्रमाणेच अमृत कलशवरही कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Home महत्वाची बातमी ‘एसबीआय’ची अमृत-कलश योजना 31 मार्च रोजी संपणार
‘एसबीआय’ची अमृत-कलश योजना 31 मार्च रोजी संपणार
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व इतरांना 7.10 टक्के वार्षिक व्याजदर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) विशेष मुदत ठेव योजना अमृत कलश या महिन्यात संपत आहे 31 मार्च रोजी. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.60टक्के आणि इतरांना 7.10 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी […]