सावंतवाडी रिजन संघ ठरला लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ चा मानकरी

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचा थरार बेळगावातील युनियन जिमखान्याच्या मैदानावर शनिवार दि २३ पासून रंगला होता.या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग घेतला होता.आज सकाळच्या सत्रात उपांत्यपूर्व फेरीत चार सामने खेळविण्यात आले.यामध्ये मॅनेजमेंट विरुद्ध मुंबई संघाने, कोल्हापूर विरुद्ध बेळगाव संघाने , पुणे विरुद्ध सावंतवाडी संघाने,आणि बेळगाव रिजन विरुद्ध म्हापसा रिजन संघाने […]

सावंतवाडी रिजन संघ ठरला लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ चा मानकरी

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचा थरार बेळगावातील युनियन जिमखान्याच्या मैदानावर शनिवार दि २३ पासून रंगला होता.या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग घेतला होता.आज सकाळच्या सत्रात उपांत्यपूर्व फेरीत चार सामने खेळविण्यात आले.यामध्ये मॅनेजमेंट विरुद्ध मुंबई संघाने, कोल्हापूर विरुद्ध बेळगाव संघाने , पुणे विरुद्ध सावंतवाडी संघाने,आणि बेळगाव रिजन विरुद्ध म्हापसा रिजन संघाने विजय मिळवला.उपांत्य फेरीत मुंबई रिजन विरुद्ध भारत लाईव्ह न्यूज मीडिया बेळगाव संघाने ११ धावांनी विजय मिळवला तर म्हापसा रिजन विरुद्ध सावंतवाडी रिजन संघाने ६५ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारत लाईव्ह न्यूज मीडिया बेळगाव संघा विरुद्ध सावंतवाडी रिजन संघाने ३ धावांच्या चुरशीने यश संपादन करत लोकमान्य प्रीमियर लीग २०२३ चा चषक आपल्या नावे केला. तर या स्पर्धेत भारत लाईव्ह न्यूज मीडिया बेळगाव हा संघ उपविजेता ठरला. यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते शानदार चषक व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर ,विठ्ठल प्रभू, पंढरी परब, सुबोध गावडे, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, को-ओर्डीनेटर विनायक जाधव, सुनील मुतगेकर, एच.आर हेड जयेश पाटील पीआरओ राजू नाईक,यांच्या सह लोकमान्य व तरुणभारत परिवार उपस्थित होता.