सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई फुले जयंती

सावंतवाडी । प्रतिनिधी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे अनेक महिला शिक्षित होऊन अनेक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. आता शिक्षित झालेल्या महिलांनी वंचित घटकातील महिलांना शिक्षित करण्याचे काम करावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी बुधवारी येथे केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई […]

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई फुले जयंती

सावंतवाडी । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे अनेक महिला शिक्षित होऊन अनेक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. आता शिक्षित झालेल्या महिलांनी वंचित घटकातील महिलांना शिक्षित करण्याचे काम करावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी बुधवारी येथे केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी डॉ.धीरज सावंत, डॉ. सागर जाधव ,उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका प्राची राणे ,शरद जामदार आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर ऐवाळे म्हणाले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित केले .त्यांनी महिला शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे महिला प्रगती करू शकल्या. महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे हे शक्य झाले असे स्पष्ट केले. सागर जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रोवला समाजात महिलांना सन्मानाचे स्थान त्या शिक्षित झाल्यामुळे मिळू शकले. त्यांचे विचार जोपासण्याची गरज आहे प्राची राणे यांनी महिला विमान चालवत आहेत सर्व क्षेत्रात महिला उच्च स्थानापर्यंत पोहोचल्या आहेत सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले त्यांची मूल्य आपण जोपासली पाहिजे असे मत स्पष्ट केले.