समविचारी संघटनांतर्फे देश वाचवा संकल्पयात्रा

बेळगाव : संविधान सुरक्षेसाठी राज्यातील समविचारी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात देश वाचवा संकल्प यात्रा प्रारंभ करण्यात आली आहे. दि. 1 एप्रिलपासून या यात्रेला चालना देण्यात आली. दि. 8 एप्रिल रोजी ती बेळगाव जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेमध्ये विविध संघटना,  समविचारी संघटना, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनेचे नेते जैनेखान, […]

समविचारी संघटनांतर्फे देश वाचवा संकल्पयात्रा

बेळगाव : संविधान सुरक्षेसाठी राज्यातील समविचारी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात देश वाचवा संकल्प यात्रा प्रारंभ करण्यात आली आहे. दि. 1 एप्रिलपासून या यात्रेला चालना देण्यात आली. दि. 8 एप्रिल रोजी ती बेळगाव जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेमध्ये विविध संघटना,  समविचारी संघटना, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनेचे नेते जैनेखान, सिद्दगौडा मोदगी, शिवलिला मिसाळे यांनी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात सत्तेतील भाजपकडून जातीचे राजकारण केले जात आहे. भाषाभेद, जातीभेद निर्माण करून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाधिकारशाही गाजवली जात आहे. संविधान बदलण्याचे वक्तव्य केले जात आहे. अशा पक्षांना निवडणुकीत धडा शिकविला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. अशा हुकूमशाही गाजविणाऱ्या पक्षाविरोधात आपला लढा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसून सामाजिक सौहार्दता अबाधित राहावी यासाठी हा लढा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपकडून विश्वासघात करण्यात आला आहे. भाववाढ, कृषी क्षेत्रातील समस्यांकडे दुर्लक्ष, बेरोजगारी वाढीस लागली आहे. यावर तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ‘अब की बार चारसो पार’ म्हणणाऱ्या भाजपला ‘इस बार बीजेपी की हार’ हे दाखवून दिले पाहिजे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात आपला लढा कायम असणार असल्याचे सांगण्यात आले.