फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये सात्विकसाईराज आणि चिरागने दुहेरीचे विजेतेपद जिंकले

सात्विकसाईराज आणि चिराग यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. या दोघांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावून भारताचा गौरव केला आहे

फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये सात्विकसाईराज आणि चिरागने दुहेरीचे विजेतेपद जिंकले

सात्विकसाईराज आणि चिराग यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. या दोघांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावून भारताचा गौरव केला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत या दोघांनी चायनीज तैपेईच्या ली जे हुई आणि यांग पो ह्सुआन यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

 

विद्यमान विश्वविजेत्या जोडीविरुद्ध पहिला गेम सहज जिंकल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी कोरियन जोडीला दुसऱ्या गेममध्येही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. भारतीय जोडीने अवघ्या 40 मिनिटांत सामना जिंकला. यानंतर अंतिम फेरीत भारतीय जोडीने चायनीज तैपेईच्या ली झे हुई आणि यांग पो ह्वान यांचा पराभव केला. या जोडीने उपांत्य फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा पराभव केला.

 

भारतीयजोडीने या वर्षी सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. या वर्षी त्यांना एकही जेतेपद पटकावता आले नसले तरी रविवारी या दोघांनी पहिले विजेतेपद पटकावले. फ्रेंच ओपनमध्ये ही जोडी तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत सात्विक आणि चिराग यांनी कोरियन जोडीचा 21-13, 21-16  असा पराभव केला होता.

 

Edited By- Priya Dixit 

 

 

Go to Source