सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी वैयक्तिक वादातून दिली

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून निर्घृण खून झाला. त्यांच्या खुनाची सुपारी त्यांच्याच शेजारच्यांने वैयक्तिक कारणातून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी वैयक्तिक वादातून दिली

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून निर्घृण खून झाला. त्यांच्या खुनाची सुपारी त्यांच्याच शेजारच्यांने वैयक्तिक कारणातून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेजारच्या व्यक्तीने हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यांच्या खुनासाठी आरोपीने 5 लाखाची सुपारी दिली होती.

ALSO READ: Parbhani Violence :परभणीत अचानक हिंसाचार उसळला, महाराष्ट्रात हिंसाचार का झाला
मयत सतीश वाघ यांचे दोन दिवसांपूर्वी फुरसुंगी फाटा येथून पहाटे चोघांनी चारचाकीतून अपहरण केले नंतर त्यांचा मृतदेह शोध घेत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मृतदेह आढळला 

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून चौकशी दरम्यान त्यांनी शेजारी राहणाऱ्यानेच त्यांना ठार मारण्यासाठी 5 लाखाची सुपारी देण्याचे काबुल केले असून शेजारच्याला पुणे पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. 

शेजारच्यांशी काही दिवसांपूर्वी सतीश वाघ यांचा वाद झाला होता. त्या वादातूनच त्यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By – Priya Dixit

 

Go to Source