विक्कीसोबत जमणार तृप्तीची जोडी
‘बॅड न्यूज’ चित्रपट 19 जुलैला झळकणार
विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि पंजाबी गायक एमी विर्क हे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बॅड न्यूज’ असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट गूड न्यूजचे निर्माते आता ‘बॅड न्यूज’ चित्रपट सादर करणार आहेत. हे तिन्ही कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.
विक्की कौशल आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित एक कॉमेडी धाटणीचा चित्रपट असेल. यापूर्वी अक्षय कुमार, कियारा अडवाणी, करिना कपूर आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार ‘गूड न्यूज’ या चित्रपटात दिसून आले होते. विक्की कौशलने चित्रपटाचे 5 पोस्टर्स आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ब्रेकिंग न्यूज : ही बॅड न्यूज आहे. तुम्ही यासाठी तयार नसाल कारण आम्ही देखील तयार नव्हतो असे विक्कीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. आनंद तिवारी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि लियो मीडियाचा हा संयुक्त प्रोजेक्ट आहे.
Home महत्वाची बातमी विक्कीसोबत जमणार तृप्तीची जोडी
विक्कीसोबत जमणार तृप्तीची जोडी
‘बॅड न्यूज’ चित्रपट 19 जुलैला झळकणार विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि पंजाबी गायक एमी विर्क हे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बॅड न्यूज’ असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट गूड न्यूजचे निर्माते आता ‘बॅड न्यूज’ चित्रपट सादर करणार आहेत. हे तिन्ही कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. विक्की […]
