Satara : 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळला

साताऱ्यात कोरेगाव तालुक्यात भाडळे खोऱ्यात हिवरे गावात एका 13 वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला. विक्रम विजय खताळ असे या मयत मुलाचे नाव आहे.

मयत विक्रमचा मृतदेह उसाच्या फडात काही शेतकऱ्यांना दिसला. त्याच्या गळयावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या घटनेची माहिती तातडीनं पोलीसांना देण्यात आली 

पोलीसांना घटनांची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. 

विक्रमच खून कोणी केला आणि का केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील शोध घेत आहे. ‘या हत्येमुळे गावात खळबळ उडाली आहे. 

Edited By- Priya DIxit  

Go to Source