पैलवान स्पोटर्सकडे सरकार चषक
वार्ताहर /कुद्रेमनी
कुद्रेमनी येथील जय हनुमान व शिवकल्याण युवक मंडळच्या वतीने आयोजित केलेल्या सरकार चषक क्रिकेट स्पर्धेत पै. वैष्णव काकतकर पुरस्कृत कुद्रेमनीच्या पैलवान स्पोटर्स क्रिकेट संघाने स्पर्धेतील विजेतेपदासह 10 हजार रुपये व चांदीचा गदाचे बक्षिस जिंकले. हॉटेल गार्डन कोर्ट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रा. पं. दिपक पाटील हे होते.माजी ग्रा. पं. अध्यक्ष वैजनाथ राजगोळकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेत दहापेक्षा जास्त संघानी भाग घेतला होता. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस हिंन्दवी स्पोटर्स क्रिकेट संघाने 7 हजार रु. व चांदीचा गदा बक्षिस जिंकले. तर तिसऱ्या क्रमांकाचे रायगड स्पोर्ट्स संघाने 5 हजार व गदा बक्षिस जिंकले. बक्षिस वितरणप्रसंगी ग्रा. पं. सदस्य अरुण देवण, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, नाना पाटील, काशिनाथ देवण, भरमाणी लोहार, विक्रम चौगुले, निलेश पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील खेळाडूनी वैयक्तिक बक्षिसे जिंकली सामनावीर भाऊ पन्हाळकर, मालिकावीर लक्ष्मण लोहार, उत्कृष्ट फलंदाज लखन धामणेकर, उत्कृष्ट गोलंदाज संदेश पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मारुती पाटील, उत्कृष्ट यष्टीरक्षक जय पाटील, शिस्तबध्द संघ हनुमान क्रिकेट संघाला चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी दिपक पाटील, वैजू राजगोळकर, शंकर पाटील, अरुण देवण उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी पैलवान स्पोटर्सकडे सरकार चषक
पैलवान स्पोटर्सकडे सरकार चषक
वार्ताहर /कुद्रेमनी कुद्रेमनी येथील जय हनुमान व शिवकल्याण युवक मंडळच्या वतीने आयोजित केलेल्या सरकार चषक क्रिकेट स्पर्धेत पै. वैष्णव काकतकर पुरस्कृत कुद्रेमनीच्या पैलवान स्पोटर्स क्रिकेट संघाने स्पर्धेतील विजेतेपदासह 10 हजार रुपये व चांदीचा गदाचे बक्षिस जिंकले. हॉटेल गार्डन कोर्ट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रा. पं. दिपक पाटील हे होते.माजी ग्रा. पं. अध्यक्ष वैजनाथ राजगोळकर […]