सरदार्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : सरकारी सरदार्स हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. हादीमनी होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर पीईओ जे. बी. पटेल उपस्थित होत्या. प्रारंभी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहन, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे राज्यस्तरीय क्रीडापटू कपिल तळवार आणि शिल्पा कुरबर यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी अनन्या कोडलीने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. यावेळी पाहुण्यानी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले. प्रास्ताविक व स्वागत क्रीडा शिक्षक एच. वाय. मास्तीहोळी यांनी केले. यावेळी एम. बी. अडके, संपदा कलकेरी, एम. एम. कुरगुंद, अल्ताफ जहांगीर, ए. आय. पटेल, कविता गानिगेर, साधना जाधव, टी. एम. शिरोळ, विजयालक्ष्मी व्ही., एम. ए. डांगी, भाग्यलक्ष्मी यलिगार, वासंती बरिगेर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक विठ्ठल कामती यांनी विशेष परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी सरदार्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
सरदार्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : सरकारी सरदार्स हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. हादीमनी होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर पीईओ जे. बी. पटेल उपस्थित होत्या. प्रारंभी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहन, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व […]
