‘8 दोन 75’मध्ये संस्कृती बालगुडे

शुभंकर तावडे देखील मुख्य भूमिकेत ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या आधी ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसली आहे. पण या जोडीची […]

‘8 दोन 75’मध्ये संस्कृती बालगुडे

शुभंकर तावडे देखील मुख्य भूमिकेत
‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या आधी ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसली आहे. पण या जोडीची ‘काळे धंदे’ ही सीरिज हिट ठरली होती. आता या जोडीचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
उदाहरणार्थ निर्मित या संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शर्वाणी-सुश्रुत यांनी या चित्रपटाच्या कथालेखनाची तर संजय मोने यांनी संवादलेखनाची जबाबदारी निभवली आहे. शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे कलाकार यात आहेत. तर पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधुत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे