‘संसद में भी केजरीवाल’ मोहीम सुरू

आम आदमी पक्षाकडून प्रचारास प्रारंभ : दिल्लीवासीयांना केजरीवालांचे आवाहन वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी शुक्रवारी पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाच्या वाढत्या वर्चस्वाचे कारण अरविंद केजरीवाल यांची विचारसरणी आहे.  आम आदमी पक्ष देशाच्या […]

‘संसद में भी केजरीवाल’ मोहीम सुरू

आम आदमी पक्षाकडून प्रचारास प्रारंभ : दिल्लीवासीयांना केजरीवालांचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी शुक्रवारी पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाच्या वाढत्या वर्चस्वाचे कारण अरविंद केजरीवाल यांची विचारसरणी आहे.  आम आदमी पक्ष देशाच्या लोकांच्या हितासाठी काम करत असल्याचा दावा मान यांनी केला आहे.
देशभरात आम आदमी पक्षाचा विस्तार झाला आहे. परंतु दिल्लीत लोकांच्या कामांना रोखण्यात येत आहे. पंजाबमधून आमच्या पक्षाचे 13 खासदार निवडून येणार आहेत, दिल्लीतील 7 ही खासदारांचे बळ केजरीवालांना पुरविले तर त्यांची शक्ती वाढणार आहे. केजरीवाल सध्या एकटेच लढत आहेत, दिल्लीवासीयांना केजरीवालांचे सामर्थ्य वाढवावे. केजरीवालांना ईडीकडून सातत्याने नोटीस मिळत आहे. विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या ठिकाणी तेथील राज्यपालच स्थानिक सरकारांच्या विरोधात पत्र लिहित आहेत. भाजपासित राज्यांमधील राज्यपालांकडून कुठलेच पत्र लिहिले जात नसल्याचा दावा मान यांनी केला आहे.
दिल्ली, पंजाबमध्ये मोफत वीज
प्रत्येक परिवाराचा हिस्सा होत दिल्लीवासीयांना मी मदत केली आहे. दिल्लीवासीयांचा बंधू तसेच पुत्र होत काम केले आहे. दिल्लीच्या प्रत्येक व्यक्तीला चांगले उपचार मिळावेत असा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक व्यक्तीच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये मोफत आणि 24 तास वीज उपलब्ध असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
भाजपने रोखली कामे
भाजपने आमच्या सरकारची कामे रोखली आहेत. भाजपला मोहल्ला क्लीनिक पाहवले नाही. भाजप आणि उपराज्यपालांनी मिळून सीसीटीव्ही कॅमेरे बसवू दिले नाहीत. यामुळे आम्हाला उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करावे लागले. मग उपराज्यपालांनी फरिश्ते योजना रोखल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे. संसदेत दिल्लीसंबंधीचा कायदा संमत केला जात होता, तेव्हा भाजपचे सातही खासदार आनंद व्यक्त करत होते. परंतु भाजपने यावेळी वीज अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचे केजरीवाल म्हणाले.
सातही खासदार जिंकवून द्या
जनतेने आम आदमी पक्षाला विधानसभेत मजबूत संख्याबळ दिले आहे. आता आम्ही दिल्लीच्या जनतेकडून सातही खासदार मागत आहोत. जनतेने आम्हाला आणि आमच्या आघाडीला सातही जागांवर विजयी करावे, आम्ही जनतेचे सदैव ऋणी राहू. दिल्लीच्या सर्व महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.