संजीवनी चे पुनरुज्जीवन पडले पुन्हा लांबणीवर
नव्याने जारी करणार निविदा : नियम-अटींमध्ये बदल करण्याचे काम सुरू
पणजी : गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या संजीवनी साखर कारखान्याला संजीवनी देण्याच्या सरकारने चालविलेल्या प्रयत्नांना अद्याप यश मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या कारखान्याचे पुनऊज्जीवन वारंवार लांबणीवर पडत आहे. सध्यस्थितीत हा प्रकल्प चालविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निविदेस प्रतिसाद म्हणून पुढे आलेले दोन्ही बोलीदार त्यातील अटींमुळे अपात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत सरकार पुन्हा एकदा सुधारित निविदा जारी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. सांगे तालुक्यात धारबांदोडा येथे असलेला सदर प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला आहे. त्यामागे विविध कारणे असली तरी हल्लीच जारी करण्यात आलेल्या निविदेस दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. परंतु ते अपात्र ठरले. आता सरकारने नियम आणि अटींमध्ये बदल करण्याचे काम हाती घेतले आहे.
निविदा दस्तऐवज सार्वजनिक-खाजगी भागिदारी खात्याद्वारे तयार करण्यात आले होते आणि बहुतांश कंपन्या या निकषात बसल्या नाहीत. आता निरोगी स्पर्धेसाठी खाते या निविदेतील काही अटी आणि नियम बदलून बोलीदारांसाठी ते व्यवहार्य बनविण्याच्या दृष्टीने काम करत आहे. त्यात प्रामुख्याने निविदेतील इथेनॉल उत्पादनाची क्षमता कमी करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे येथे सदर प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल कमी प्रमाणात पिकवला जात आहे. सुमारे 80 कोटी गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात प्रतिदिन 700 टन ऊस गाळप क्षमतेचा प्लांट आणि प्रतिदिन 45 किलो लिटर क्षमतेचा झीरो-लिक्विड डिस्चार्ज इथेनॉल उत्पादन प्लांट यांचा समावेश आहे. त्याशिवाय बियाणे विकास आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे किमान 235 जणांना थेट रोजगार प्राप्त होण्याची शक्यता आहे.
Home महत्वाची बातमी संजीवनी चे पुनरुज्जीवन पडले पुन्हा लांबणीवर
संजीवनी चे पुनरुज्जीवन पडले पुन्हा लांबणीवर
नव्याने जारी करणार निविदा : नियम-अटींमध्ये बदल करण्याचे काम सुरू पणजी : गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या संजीवनी साखर कारखान्याला संजीवनी देण्याच्या सरकारने चालविलेल्या प्रयत्नांना अद्याप यश मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या कारखान्याचे पुनऊज्जीवन वारंवार लांबणीवर पडत आहे. सध्यस्थितीत हा प्रकल्प चालविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निविदेस प्रतिसाद म्हणून पुढे आलेले दोन्ही बोलीदार त्यातील अटींमुळे […]