संजय राऊत वेगळे…महाविकास आघाडी वेगळी…लवकरच तिसरी आघाडी उभी करणार- प्रकाश आंबेडकर
आम्ही ज्यांच्यावर टिका केली ते संजय राऊत आहेत महाविकास आघाडी वेगळी आहे असे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात मजबूत आघाडी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला अपेक्षित असलेली आघाडी होऊ शकली नाही. पण येत्या दोन दिवसांमध्ये भाजपविरोधात मोठी आघाडी उभी करणार असल्याचं विधान वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीबरोबर जागावाटप फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडींच्या नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये नाना पटोलेंपासून संजय राऊतांपर्यंत निशाण्यावर होते.
दरम्यान, आज सकाळी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले असून येत्या तीन चार दिवसात ती आकाराला येईल असे म्हटलं आहे. ते म्हणाले,”राज्यात मोदीविरूद्ध आघाडी करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केला. पण आम्हाला हवी तशी आघाडी तयार करण्यात यश आलं नाही. पण आता आम्ही महाराष्ट्रात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्नात असून लवकरच ती उभी करू.” असे म्हटलं आहे.
यावेळी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेवर भाष्य करताना ते म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीवर टिका केली नाही. आम्ही संजय राऊत यांच्यावर टिका केली. संजय राऊत वेगळे आणि महाविकास आघाडी वेगळी” असे त्यांनी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी संजय राऊत वेगळे…महाविकास आघाडी वेगळी…लवकरच तिसरी आघाडी उभी करणार- प्रकाश आंबेडकर
संजय राऊत वेगळे…महाविकास आघाडी वेगळी…लवकरच तिसरी आघाडी उभी करणार- प्रकाश आंबेडकर
आम्ही ज्यांच्यावर टिका केली ते संजय राऊत आहेत महाविकास आघाडी वेगळी आहे असे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात मजबूत आघाडी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला अपेक्षित असलेली आघाडी होऊ शकली नाही. पण येत्या दोन दिवसांमध्ये भाजपविरोधात मोठी आघाडी उभी करणार असल्याचं विधान वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीबरोबर जागावाटप फिस्कटल्याने […]