विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेला उशीर झाल्याबद्दल संजय राऊत काँग्रेसवर नाराज
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी झाली आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या मित्रपक्षांशी जागावाटपावर चर्चा सुरू केली आहे. अद्याप दोन्ही पक्षात जागावाटपाचा बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या जागावाटप वरून माविआ मध्ये तणाव वाढत आहे.
चर्चा सुरु झाली मात्र काहीच प्रगती झाली नाही. या वरून शिवसेना उबाठा नेते संजय राऊतांनी महाराष्ट्र काँग्रेसवर नाराजगी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेला उशीर झाल्याबद्दल महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जबाबदार ठरवले आहे.
राऊत म्हणाले की , उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि अन्य पक्षाला घेऊन चालणारी महाविकास आघाडी मुंबईत एकत्र बसून जागावाटपाचा प्रश्न सोडवतील. सध्या काँग्रेस खूप व्यस्त आहे. असं असून देखील आम्हाला चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. आम्ही या साठी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित केले असून ते नेहमी पुढची तारीख देत आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, पुढील तीन दिवस आम्ही एकत्र बसून चर्चा करणार.
मंगळवारी सेनेच्या खासदाराने सांगितले की, तिन्ही पक्षांचे नेते बुधवार ते शुक्रवार जागा वाटपावर चर्चा करतील. ते म्हणाले की, मुंबईबाबतची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे, पण महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने प्रदेशनिहाय चर्चा होण्याची गरज आहे. मुंबईतील 36 पैकी 20-22 जागांवर शिवसेनेचे लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी 115 ते 125 जागा लढवण्याचे शिवसेनेचे (UBT) उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By – Priya Dixit