कुडाळ- मालवणात संजय आंग्रे निवडणूक लढवतील

रुपेश पावसकरांची माहिती  वार्ताहर/ कुडाळ अगामी लोकसभा विधानसभा निवडणुका या आम्ही शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. त्याचप्रमाणे कुडाळ – मालवण मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे संजय आंग्रेच या मतदार संघातून निवडणूक लढवतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा संघटक रुपेश […]

कुडाळ- मालवणात संजय आंग्रे निवडणूक लढवतील

रुपेश पावसकरांची माहिती 
वार्ताहर/ कुडाळ
अगामी लोकसभा विधानसभा निवडणुका या आम्ही शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. त्याचप्रमाणे कुडाळ – मालवण मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे संजय आंग्रेच या मतदार संघातून निवडणूक लढवतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर निवडणूक लढवणार आहेत. अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे युती आहे, त्याप्रमाणे निवडणूक लढविली जाईल.असेही त्यांनी सांगितले.कुडाळ-एमआयडीसी येथील विश्रामगृहावर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,तालुका प्रमुख बंटी तुळसकर, नेरुर विभाग अध्यक्ष नंदकीशोर सावंत, सदस्य नरेंद्र नेरुरकर, सदस्य रुपेश पेडणेकर, रामकृष्ण (बाबू) गडकरी उपस्थित होते.
पावसकर म्हणाले, येणाऱ्या लोकसभेत विधानसभा निवडणुकीसाठी आठही तालुक्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न राहतील. त्याचप्रमाणे लोकसभा ,विधानसभा या दोन्ही निवडणूकाही आम्ही शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. कुडाळ – मालवण मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी, अशी कुडाळ- मालवण शिवसेना पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी सभा घेतली आहे. त्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संजय आंग्रे यांचे नाव सूचविले आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदार संघात शिवसेना पक्षाचाच आमदार असणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. असे त्यांनी सांगितले.