सांगली शिवसेनेला तर भिवंडी राष्ट्रवादी- शरद पवार गटाला! महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीचे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी जागावाटप झाले असून आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले. या जागावाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सगळ्यात जास्त २१ जागा; काँग्रेसला १७ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा १० जागा मिळाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून चाललेल्या जागावाटपाच्या सांगलीच्या तिढ्य़ावर आज शेवटी शिवसेना ठाकरे गटाची […]

सांगली शिवसेनेला तर भिवंडी राष्ट्रवादी- शरद पवार गटाला! महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीचे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी जागावाटप झाले असून आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले. या जागावाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सगळ्यात जास्त २१ जागा; काँग्रेसला १७ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा १० जागा मिळाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून चाललेल्या जागावाटपाच्या सांगलीच्या तिढ्य़ावर आज शेवटी शिवसेना ठाकरे गटाची मोहोर उमटली असून भिवंडीच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला गेली आहे.
मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे महाविकास आघाडीच्या ४८ जागांचे उमेदवार घोषित करण्यात आले. गेल्या महिनाभर चालु असलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असून शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी अनुक्रमे २१- १७- १० असा ठरला आहे.
सांगली आणि भिवंडी या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच चालू होती. या जागेवरून दावे प्रतिदावे केले जात होते. या दोन्ही कारणामुळे महाविकास आघाडीमध्य़े काहीस तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. सांगलीची जागा मित्रपक्षांना विश्वासात न घेता शिवसेनेने जाहीर केली असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. पण आज अखेर ही जागा शिवसेनेला सुटली गेली आहे. तर भिवंडीच्या जागेवरूनही रस्सीखेच चालू असताना या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वाट्याला ही जागा गेली आहे.
मुंबईतील सहापैकी चार – उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, दक्षिण आणि दक्षिण पूर्व या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असून उरलेल्या उत्तर आणि उत्तर मध्य या दोन जागा काँग्रेस लढवणार आहे. 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील ६ जागापैकी भारतीय जनता पक्षाने ३ आणि शिवसेनेने ३ जागा जिंकल्या होत्या.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बाहेर…
वंचित बहूजन आघाडीला या जागावाटपामध्ये आता स्थान मिळाले नसून वंचित आता आघाडीमध्ये नसल्याचं अंतिम स्पष्ट झालं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला असर्थता आणि गेल्या काही दिवसांपासून आंबेडकरांची आघाडीविरोधातील वक्तव्ये यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीअंतर्गत तणाव वाढला होता. शेवटी आज महाविकास आघाडीने आपल्या जागावाटपामध्य़े वंचितला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे.