सांगलीत आज महायुतीचे शक्तीप्रदर्शन ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कार्यकर्ता मेळावा होणार सांगली प्रतिनिधी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने दुपारी अडीच वाजता येथील स्टेशन चौकामध्ये महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शनही होणार आहे. यामध्ये जवळपास 20 हजारांवर […]

सांगलीत आज महायुतीचे शक्तीप्रदर्शन ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कार्यकर्ता मेळावा होणार

सांगली प्रतिनिधी

भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने दुपारी अडीच वाजता येथील स्टेशन चौकामध्ये महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शनही होणार आहे. यामध्ये जवळपास 20 हजारांवर कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
गुऊवार दि. 18 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर स्टेशन चौकामध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपासह घटक पक्षांचे जवळपास 20 हजारांवर कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होतील. उन्हामुळे रॅली होणार नाही. सभेतच शक्तीप्रदर्शन कऊ, असे सांगत खासदार पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच सांगलीत येणार आहेत. त्यांची सभा होईल. पण तारीख अजून निश्चित झालेली नाही असे सांगत खासदार पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तारीख दोन-तीन दिवसांमध्ये अंतिम होईल. दरम्यान प्रत्येकाला वाटतयं की माझच जमतयं. पण ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना केला.