खळबळ…राष्ट्रवादीचे चौघे नियोजन समितीत…लेट तरीही थेट!

भाजप, सेनेची यादी प्रलंबित : वैभव पाटील, जगदाळेंसह चौघांना दादांनी केले विशेष निमंत्रित सांगली प्रतिनिधी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पाठवलेली यादी अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत मंत्रालयात रेंगाळली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना चांगलाच दणका देत लेट येऊन थेट दावा सांगितला आहे. सांगली जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) चार जणांना […]

खळबळ…राष्ट्रवादीचे चौघे नियोजन समितीत…लेट तरीही थेट!

भाजप, सेनेची यादी प्रलंबित : वैभव पाटील, जगदाळेंसह चौघांना दादांनी केले विशेष निमंत्रित

सांगली प्रतिनिधी

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पाठवलेली यादी अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत मंत्रालयात रेंगाळली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना चांगलाच दणका देत लेट येऊन थेट दावा सांगितला आहे. सांगली जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) चार जणांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
यामध्ये राष्टवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह पुष्पा जयंतराव पाटील (करगणी, ता. आटपाडी) व सुनिल रावसाहेब पवार (सनमडी, ता. जत) यांचा समावेश आहे. सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडी रखडल्या आहेत. मंत्रालयात पालकमंत्र्यांनी निश्चित केलेली यादी पडून आहे असे असताना आधी पाठवलेली यादी प्रलंबितच पद्माकर जगदाळे असून विशेष निवडीची यादी जाहीर झाल्याने महायुतीतील पक्षांमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच मित्रपक्षांनी आम्ही तुम्हाला बँडवाले आहोत की काय? असा प्रश्न केला असताना अजितदादांच्याकडून झालेली ही कुरघोडी जिल्हयात चर्चेची ठरणार आहे.
यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर अजितदादा गटाकडून कोणाला संधी मिळणार याची चर्चा होती. आता आपल्यापैकी कोणाचा पत्ता कापला जाणार याची चिंता या पक्षांना लागणार आहे. संक्रांतीच्या गोड दिनी नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांच्या सहीने एक शासन आदेश जारी झाला असून वैभव पाटील, पद्माकर जगदाळे, पुष्पा पाटील व सुनील पवार यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. यामुळे अजितदादा गटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या गटाची ताकदही वाढली आहे.