Sangli कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई Sangli कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई

Sangli: कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई

Sangli कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई
Sangli कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई
Sangli कर्नाटक बसमधून पाच लाखांची रोकड जप्त, म्हैसाळ चेकपोस्टवर कारवाई

म्हैसाळ : मिरज-कागवाड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ५ लाख १९ हजार ६०० रूपयांची रक्कम जप्त केली. याप्रकरणी ओंकार नारायण रायबागी (वय ५५) रा. सिंदापूर, रा. रायबाग) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर चेकपोस्ट उभा करण्यात आले आहेत. काल, रविवारी (KA-२३-F-०८४४) या कर्नाटक बसमधून ओंकार रायबागी हा इसम प्रवास करत होता. म्हैसाळ येथे चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक बसमधील सर्व प्रवाशांची बँग चेक करताना ओंकार रायबागी याच्याजवळ ५ लाख १९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.

यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकांचे प्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, पोलिस अधिकारी महेश माने, पोलिस नाईक दिपक कांबळे, प्रविण खंचनाळे उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *