संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा विवाहबंधनात अडकली

संगीत देवबाभळीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने सुमित म्हशेळकरशी लग्न केलं असून हे तिचे दुसरे लग्न आहे. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली होती.2025 मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत …

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा विवाहबंधनात अडकली

संगीत देवबाभळीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने  सुमित म्हशेळकरशी लग्न केलं असून हे तिचे दुसरे लग्न आहे. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली होती.2025 मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत विभक्त होत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. आज तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असून तिच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. 

ALSO READ: अभिनेत्री गिरिजा ओकने एआय-मॉर्फ केलेल्या अश्लील प्रतिमांबद्दल चिंता व्यक्त केली

अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी रिपोस्ट केली असून या स्टोरीत शुभांगी आणि सुमित एका खुर्चीवर बसलेले दिसत आहे. 

अभिनेत्रीने जांभळी साडी परिधान केली होती.तर नवरदेव सुमितने साडीच्या काठाशी मॅचिंग कुर्ता घातला होता. 

अतिशय साध्या पद्धतीने शुभांगी आणि सुमितचा लग्नसोहळा पार पडला. 

ALSO READ: Marathi Web Series : दमदार अभिनयाने सजलेल्या टॉप ५ ‘Must Watch’

अभिनेत्रींचे पहिले लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी 2020 झाले. पाच वर्षाच्या वैवाहिक संसारांनंतर त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानन्तर तीन महिन्यांनंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं. 

ALSO READ: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप केला साखरपुडा, या राजकीय घराण्याची होणार सून

अभिनेत्रींच्या कारकिर्दी बद्दल बोलायचे तर शुभांगी सदावर्ते लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून तिने संगीत देव बाभळी नाटकात आवलीची भूमिका साकारली. ती नवे लक्ष्य मालिकेत देखील दिसली. तसेच महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात देखील तिने अभिनय केला आहे. 

 

Edited By – Priya Dixit