नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांची उमेदवारी दाखल
शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी ; नगरसेवक पदाच्या 17 जागांवरही अर्ज दाखल
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांच्यासहित एकूण 17 नगरसेवक जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. कणकवली मध्ये विकासाचा नवीन पॅटर्न अर्थात कणकवली पॅटर्न आपणाला दिसून येईल. जो राज्यभर जाईल. भय, दहशत आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात परिवर्तन झालेले आपणाला निश्चितपणे दिसून येईल असा विश्वास श्री. पारकर यांनी व्यक्त केला.शहर विकास आघाडीच्या माध्यमातून श्री पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शहर विकास आघाडीच्या 17 ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, वाटायच्या महिला आघाडी प्रमुख नीलम पालव यांच्यासहित प्रमुखा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.कणकवली मध्ये शहरवासीयांच्या मागणीनुसार आपण निवडणूक लढवत आहोत. स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली आणि भयमुक्त कणकवली करण्यासाठी तसेच कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सर्व पक्षीयांनी एकत्रित येत शहरवासीयांना न्याय देण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. सर्व राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सक्षम पर्याय म्हणून आम्ही जनतेसमोर असून तीन तारीखला आपणाला परिवर्तन झालेले दिसेल असा विश्वास श्री पारकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
Home महत्वाची बातमी नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांची उमेदवारी दाखल
नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांची उमेदवारी दाखल
शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी ; नगरसेवक पदाच्या 17 जागांवरही अर्ज दाखल कणकवली / प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांच्यासहित एकूण 17 नगरसेवक जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. कणकवली मध्ये विकासाचा नवीन पॅटर्न अर्थात कणकवली पॅटर्न आपणाला दिसून येईल. जो राज्यभर जाईल. भय, दहशत आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात […]
