समादेवी पालखी सोहळा अमाप उत्साहात
ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक : विविध धार्मिक कार्यक्रम : आज महाप्रसाद
बेळगाव : सीमेचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समादेवीचा पालखी सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. समादेवी पालखी सोहळ्यामध्ये ढोल-ताशाचा गजर, देवीचा गजर झाला. देवी आपले रक्षण कर, असे साकडेही देवीला भाविकांनी घातले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने भाविकांनी या सोहळ्यामध्ये सहभाग दर्शविला. समादेवी जन्मोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी व दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी ढोल-ताशाच्या गजरात पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी व महिलांनी सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी देवीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महिलांनी देवीला ओटी भरली. त्यानंतर सायंकाळी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक काढण्यापूर्वी रस्त्यावर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. महिलांनी पालखीसमोर पाणी ओतून आरती ओवाळली. या पालखी सोहळ्यानंतर चित्प्रकाशानंद सरस्वती स्वामींच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालखी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर पाहुणी कार्यक्रम पार पडला. पालखी तसेच इतर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला होता.
Home महत्वाची बातमी समादेवी पालखी सोहळा अमाप उत्साहात
समादेवी पालखी सोहळा अमाप उत्साहात
ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक : विविध धार्मिक कार्यक्रम : आज महाप्रसाद बेळगाव : सीमेचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समादेवीचा पालखी सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. समादेवी पालखी सोहळ्यामध्ये ढोल-ताशाचा गजर, देवीचा गजर झाला. देवी आपले रक्षण कर, असे साकडेही देवीला भाविकांनी घातले. […]
