समादेवी जन्मोत्सवाची उत्साहात सांगता
विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वितरण
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या समादेवी वार्षिक जन्मोत्सव कार्यक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. मंगळवारपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकळी 7.30 ते दुपारी 12 यावेळेत नवचंडिका होम करण्यात आला. महादेव गावडे व मंदा गावडे यांच्या हस्ते होमविधीचा कार्यक्रम झाला. चौथ्या दिवशी देवीला महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी 6 ते 7 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. समादेवी जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला अबालवृद्धासह भक्तांनी गर्दी केली होती. विशेषत: सकाळपासून समादेवी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढली होती. मंदिरात तीर्थप्रसाद देण्यात आला. त्याबरोबर सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Home महत्वाची बातमी समादेवी जन्मोत्सवाची उत्साहात सांगता
समादेवी जन्मोत्सवाची उत्साहात सांगता
विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वितरण बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या समादेवी वार्षिक जन्मोत्सव कार्यक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. मंगळवारपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकळी 7.30 ते दुपारी 12 यावेळेत नवचंडिका होम करण्यात आला. महादेव गावडे व मंदा गावडे यांच्या हस्ते […]