हरियाणात सैनी सरकारने जिंकला ‘विश्वास’ ठराव
जेजेपीच्या आमदारांची सभागृहात ‘दांडी’
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणातील सैनी सरकारला बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. हा प्रस्ताव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या विश्वासदर्शक ठरावाबाबत जेजेपीने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करून कोणत्याही आमदाराने सभागृहात हजर राहू नये, असे म्हटले होते. मात्र व्हिप जारी करूनही जेजेपीचे पाच आमदार सभागृहात पोहोचले. मात्र, विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वीच या पाचही आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. एकंदर विश्वासदर्शक ठरावावेळी जेजेपीचे सर्व 10 आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले.
विश्वासदर्शक ठरावादरम्यान अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनीही सदनातून वॉकआउट केले. हरियाणा विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 90 आहे. तर भाजपचे एकूण 41 आमदार आहेत. तर बहुमताचा आकडा 46 आहे. अशा परिस्थितीत जेजेपीचे सर्व 10 आमदार (पाच सभागृहात आले नाहीत तर पाच सभागृहातून परतले) आणि एक अपक्ष आमदार बाहेर पडल्याने विधानसभेतील एकूण संख्या आता 79 झाली आहे. त्यानुसार बहुमताचा आकडा 40 झाला. तर भाजपचे सभागृहात 41 आमदार आहेत.
नायबसिंग सैनी यांनी मंगळवारी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंगळवारी सकाळी मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी नायबसिंग सैनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सैनी यांच्याशिवाय कंवरपाल गुजर आणि मूलचंद शर्मा यांनीही पॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय रणजित सिंह, जयप्रकाश दलाल आणि डॉ. बनवारीलाल यांनीही पॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Home महत्वाची बातमी हरियाणात सैनी सरकारने जिंकला ‘विश्वास’ ठराव
हरियाणात सैनी सरकारने जिंकला ‘विश्वास’ ठराव
जेजेपीच्या आमदारांची सभागृहात ‘दांडी’ वृत्तसंस्था/ चंदीगड हरियाणातील सैनी सरकारला बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. हा प्रस्ताव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या विश्वासदर्शक ठरावाबाबत जेजेपीने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करून कोणत्याही आमदाराने सभागृहात हजर राहू नये, असे म्हटले होते. मात्र व्हिप जारी करूनही जेजेपीचे पाच आमदार सभागृहात पोहोचले. […]
