‘एक दिन’ चित्रपटात साई पल्लवी
जुनैद खानसोबत जमणार जोडी
आमिर खानचा पुत्र जुनैद खानचा नवा चित्रपट ‘एक दिन’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैदची झलक दिसून येत आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे.
पोस्टरमध्ये जुनैद आणि साई हे हिमवृष्टीत कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीम खात असल्याचे दाखविण्यात आले आहे. ‘जीवनाच्या उलथापालथीत प्रेम तुम्हाला शोधेल, एक दिवस’ असे याच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दशंन सुनील पांडे यांनी केले आहे. तर कहाणी स्नेहा देसाई आणि स्पनंद मिश्रा यांनी लिहिली आहे. मंसूर खान, आमिर खान आणि अपर्णा पुरोहित हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर संगीत राम संपत यांनी दिले आहे.
एक दिन हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित थाई चित्रपट ‘वन डे’चा हिंदी रिमेक आहे. साईचा हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. जुनैदने 2024 मध्ये ‘महाराज’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर मागील वर्षी त्याचा ‘लवयापा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. तर साई पल्लवी ही रणवीर कपूरसोबत ‘रामायण’ चित्रपटात काम करत आहे.
Home महत्वाची बातमी ‘एक दिन’ चित्रपटात साई पल्लवी
‘एक दिन’ चित्रपटात साई पल्लवी
जुनैद खानसोबत जमणार जोडी आमिर खानचा पुत्र जुनैद खानचा नवा चित्रपट ‘एक दिन’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैदची झलक दिसून येत आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे. पोस्टरमध्ये जुनैद आणि साई हे हिमवृष्टीत कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीम […]
