साई किशोरने इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ दाखवला

साई किशोरने इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ दाखवला आहे आणि डरहमविरुद्धच्या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या आहे. स्टार फिरकी गोलंदाज साई किशोर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाही. तो सध्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी आहे, जिथे …

साई किशोरने इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ दाखवला

साई किशोरने इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ दाखवला आहे आणि डरहमविरुद्धच्या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या आहे. स्टार फिरकी गोलंदाज साई किशोर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाही. तो सध्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी आहे, जिथे त्याने सरे संघासाठी दमदार गोलंदाजीचा नमुना सादर केला आहे आणि डरहमविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर डरहमचे फलंदाज टिकू शकले नाहीत.

साई किशोरने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या
डरहमविरुद्धच्या सामन्यात, साई किशोरने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्या, त्यानंतर त्याला फक्त १२ षटके टाकता आली. त्यानंतर, दुसऱ्या डावात त्याची कामगिरी आणखी चांगली झाली आणि त्याने ४१.४ षटकांत ७२ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, त्याने सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या आणि विरोधी फलंदाजांसाठी अडचणीचे कारण ठरला. काउंटी चॅम्पियनशिपमधील हा त्याचा दुसराच सामना आहे. मागील सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या.

ALSO READ: England vs India 5th Test भारत आणि इंग्लंडमधील पाचवा सामना आज ओव्हल मैदानावर खेळला जात आहे
Edited By- Dhanashri Naik

Go to Source