सहजा विजयी, वैदेही पराभूत

नागपूर : येथे सुरू असलेल्या महा ऊर्जा आयटीएफ महिलांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्लीने आपल्याच देशाच्या वैदेही चौधरीचा पराभव करून विजयी सलामी दिली. मात्र भारताच्या वैष्णवी अडकरला पहिल्याच फेरीत जपानच्या खेळाडूकडून हार पत्करावी लागली. पहिल्या फेरीतील सामन्यात सहजा यमलापल्लीने वैदेही चौधरीचा 3-6, 6-1, 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. रुमानियाच्या इरिना बाराने भारताच्या […]

सहजा विजयी, वैदेही पराभूत

नागपूर : येथे सुरू असलेल्या महा ऊर्जा आयटीएफ महिलांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्लीने आपल्याच देशाच्या वैदेही चौधरीचा पराभव करून विजयी सलामी दिली. मात्र भारताच्या वैष्णवी अडकरला पहिल्याच फेरीत जपानच्या खेळाडूकडून हार पत्करावी लागली. पहिल्या फेरीतील सामन्यात सहजा यमलापल्लीने वैदेही चौधरीचा 3-6, 6-1, 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. रुमानियाच्या इरिना बाराने भारताच्या आकांक्षा निटूरेचा 6-1, 6-3, जपानच्या इकुमी यमाझेकीने वैष्णवी अडकरचा 3-6, 6-4, 6-3, कोरियाच्या बॅकने भारताच्या अंजली राठीचा 6-1, 6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.