Maharashtra Tourism : जागतिक महिला दिनानिमित्त जर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा एकट्याने सहलीचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहे जी सुरक्षित, निसर्गरम्य आणि फिरण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खालीलपैकी एका ठिकाणाची निवड करू शकता व सहलीला नक्कीच जाऊ शकतात.
ALSO READ: मुंबई-पुण्याजवळच्या ‘या’ ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता
गणपतीपुळे (रत्नागिरी)
जर तुम्हाला शांतता आणि स्वच्छ समुद्रकिनारा हवा असेल, तर गणपतीपुळे हा एक चांगला पर्याय आहे.
खास आकर्षण: स्वयंभू गणेश मंदिर, प्राचीन कोकण संग्रहालय आणि आरे-वारे बीच.
धार्मिक वातावरण आणि सुरक्षित राहण्याची सोय यामुळे महिलांच्या सहलीसाठी हे योग्य आहे.
मंदिरे (नाशिक)
एक वेगळा अनुभव हवा असेल तर नाशिकला भेट देऊ शकता.
खास आकर्षण: त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी.
तुम्ही नाशिक मध्ये पंचवटी मधील मंदिरे तसेच त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊ शकतात जिथे सुरक्षा असते.
अलिबाग (रायगड)
अलिबाग हे महिलांच्या ग्रुपसाठी अत्यंत सुरक्षित आणि पसंतीचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्याने इथे पोहोचणे सोपे आहे.
खास आकर्षण: वरसोली, नागाव आणि आक्षी समुद्रकिनारे, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा.
तसेच येथील ‘होम स्टे’ सुरक्षित आहे आणि कोकणी जेवणाचा आस्वाद घेता येतो. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची बोट सफर हा एक वेगळा अनुभव असतो.
लोणावळा आणि खंडाळा (पुणे)
मार्च महिन्यात हवामान थोडे उबदार असले तरी, येथील डोंगराळ भाग आणि रिसॉर्ट्स निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे.
खास आकर्षण: टायगर पॉईंट, भुशी डॅम, कार्ला-भाजे लेणी आणि लोहगड किल्ला.
हे ठिकाण पर्यटकांनी नेहमी गजबजलेले असल्याने सुरक्षित आहे. इथे अनेक ‘ऑल-वुमन’ ग्रुप ट्रिप्स आणि कॅम्पिंगचे आयोजन केले जाते.
महाबळेश्वर आणि पाचगणी (सातारा)
थंड हवेचे ठिकाण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
खास आकर्षण: वेण्णा लेक, ऑर्थर सीट, मॅप्रो गार्डन आणि स्ट्रॉबेरी फार्म्स.
मार्च महिन्यात स्ट्रॉबेरीचा सीझन असतो. पाचगणीमधील बोर्डिंग स्कूल्स आणि पर्यटकांमुळे हे वातावरण महिलांसाठी अतिशय पोषक आहे.
सुरक्षित प्रवासासाठी टिप्स
शक्यतो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट्स किंवा नामांकित हॉटेल्स निवडा.
दिवसा प्रवास करण्याला प्राधान्य द्या. ‘गुगल मॅप्स’चा वापर करा आणि स्वतःचे लोकेशन घरच्यांसोबत शेअर करा.
जर तुम्ही पहिल्यांदाच बाहेर पडत असाल, तर अनेक ट्रॅव्हल कंपन्या फक्त महिलांसाठी खास सहली आयोजित करतात, त्यांचा विचार करू शकता.
ALSO READ: Women’s Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या
