राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मी यांची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मी यांची रात्री मुंबईतील भायखळा परिसरात म्हाडा कॉलोनीच्या मागे अज्ञात हल्लेखोऱ्यानी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.पोलीस पुढील तपास करत आहे.

सदर घटना शुक्रवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली.अज्ञात 2 ते 3 हल्लेखोऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून पसार झाले. हल्लेखोऱ्यांची ओळख अद्याप पटली  नाही. 

घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी सचिन यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. 

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते होते. आणि राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Edited by – Priya Dixit  

Go to Source