रशियातील दहशतवादी हल्ल्यात 110 हून अधिक ठार! देशभरातून निषेध
रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशात मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये बंदूकधारी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात किमान 115 लोक जागीच ठार झाले असून सुमारे 145 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर एका कारचा पाठलाग करून पोलिसांनी 11 संशयितांना अटक केली असून या हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या 4 बंदूकधाऱ्यांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
रशियन सुरक्षा एजन्सीने या बाबत अधिक माहीती देताना म्हटले आहे कि, हल्लेखोर हे युक्रेनच्या संपर्कात असूने ते रशिया युक्रेन सीमेकडे जात होते. दहशतवादी हल्ला केल्यानंतर, गुन्हेगारांचा रशियन- युक्रेनियन सीमा ओलांडण्याचा हेतू असल्याचं एफएसबीने म्हटलं आहे.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्की यांनी या हल्ल्याशी युक्रेनचा काहीही संबंध नाही. तर त्याच्या लष्करी गुप्तचरांनी या घटनेला रशियन प्रक्षोभक म्हटले आणि मॉस्को विशेष सेवा त्यामागे असल्याचा आरोप केला.
इस्लामिक स्टेट गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना असे म्हटलं आहे की, त्यांच्या सैनिकांनी मॉस्कोच्या बाहेर चालु असलेल्या एका मोठ्या कार्यक्रमावर हल्ला करून सुरक्षितपणे माघारी परतले आहेत.” असेही ते म्हणाले.
गणवेश घातलेले हल्लेखोरांनी कार्यक्रम असलेल्या इमारतीत घुसून अंधाधुन गोळीबार केला. त्याचबरोबर त्यांनी ग्रेनेड आणि आगीचे बॉम्ब फेकले. युरोपियन युनियन, फ्रान्स, स्पेन आणि इटलीने अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेने या हल्ल्याला भयंकर म्हणताना युक्रेनमधील संघर्षाशी याचा कोणताही संबंध दिसत नसल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधानांकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. “आम्ही मॉस्कोमधील जघन्य दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दु:खाच्या काळात भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे,” असे पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले.
Home महत्वाची बातमी रशियातील दहशतवादी हल्ल्यात 110 हून अधिक ठार! देशभरातून निषेध
रशियातील दहशतवादी हल्ल्यात 110 हून अधिक ठार! देशभरातून निषेध
रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशात मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये बंदूकधारी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात किमान 115 लोक जागीच ठार झाले असून सुमारे 145 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर एका कारचा पाठलाग करून पोलिसांनी 11 संशयितांना अटक केली असून या हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या 4 बंदूकधाऱ्यांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. रशियन सुरक्षा एजन्सीने […]