विरोधकांकडून गॅरंटी योजनांविषयी अफवा
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : मुडलगी येथे प्रचारसभेत भाजपचा खोटारडेपणा केला उघड
बेळगाव : मागासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देवराज अर्स यांच्याप्रमाणेच मागासवर्गीयांसाठी सर्वाधिक योजना राबवून विकास साधला आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. अरभावी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुडलगी शहरात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्य सरकारकडून जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना सर्व नागरिकांसाठी लाभदायक ठरत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. गॅरंटी योजना थांबविल्या जाणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. गोकाकच्या आमदारांकडून असे सांगितले जात आहे. सिद्धरामय्या यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील जनतेसह मागासवर्गीयांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. निवडणुकीपूर्वी केंद्रात मंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून चार वेळा भाजप उमेदवारालाच निवडून देण्यात आले आहे. मात्र, कोणताच विकास झाला नसल्याने केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, काँग्रेस पक्षातील नेतेच खरे देशभक्त आहेत. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. स्वातंत्र्यादरम्यान भाजपचा जन्मही झाला नव्हता. चक्रवर्ती सुलीबेले यांच्या माध्यमातून जनतेला खोटी माहिती देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. भाजपने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. ते केवळ खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी अरविंद दळवाई, अनिल दळवाई, बी. बी. हंदिगुंद, एस. आर. सोनवालकर, प्रकाश अरळी, लखन संसुद्दी, रमेश उटगी, सुरेश मगदूम, रवी मुडलगी आदी उपस्थित होते. मुडलगी येथील श्री शिवबोधरंग मठाला भेट देऊन श्रीपाद अमृतस्वामीजी आणि समर्थस्वामीजी यांचा आशीर्वाद घेतला.
Home महत्वाची बातमी विरोधकांकडून गॅरंटी योजनांविषयी अफवा
विरोधकांकडून गॅरंटी योजनांविषयी अफवा
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : मुडलगी येथे प्रचारसभेत भाजपचा खोटारडेपणा केला उघड बेळगाव : मागासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देवराज अर्स यांच्याप्रमाणेच मागासवर्गीयांसाठी सर्वाधिक योजना राबवून विकास साधला आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. अरभावी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुडलगी शहरात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, […]