रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ साऊथतर्फे दि. 9 आणि 10 मार्च रोजी मालिनी सिटी येथे सायंकाळी 6 वाजता ‘अयोध्या’ या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. अयोध्यानगरीत साकारलेले राम मंदिर हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नसून न्याय, मर्यादा, त्याग व तत्त्वनिष्ठा तसेच जीवनाचे सामाजिक भान याचे चिरंतर अधिष्ठान आहे. याची अनुभूती जनमानसाला व्हावी, हा या महानाट्याचा उद्देश आहे. रोटरी क्लब साऊथ ही एक नामांकित सामाजिक संस्था आहे. गेल्या 34 वर्षांच्या समाजसेवेत शाळांची सुधारणा, बाल संस्कार शिबिर, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांसाठी हृदयशस्त्रक्रिया, पोलिओ निर्मूलन अशा अनेक प्रकल्पांची भेट समाजाला दिली आहे. आतापर्यंत 3,50,000 डॉलर्सचा निधी रोटरी फाऊंडेशनला देणगी रूपात रोटरी सदस्यांनी दिला आहे.
नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्वात अग्रेसर अशी या संस्थेची ओळख आहे. समाजाची गरज ओळखून त्या अनुषंगाने कार्य करीत असताना बेळगावात गरजू रुग्णांसाठी एक सुसज्ज रक्तपेढी उभारण्याचे स्वप्न या संस्थेतील सदस्यांनी पाहिले आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ‘अयोध्या’ या महानाट्यातून संकलित होणारा निधी तसेच देणगी स्वरुपात मिळणारी आर्थिक मदत आणि रोटरी फाऊंडेशनच्या साहाय्याने या स्वप्नाची पूर्तता होईल, असा विश्वास रोटरी सदस्यांना आहे. ‘अयोध्या’ या महानाट्यात अनेक युगांच्या प्रतीक्षेनंतर साकारलेल्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्याची गौरवशाली शौर्यगाथा मांडली आहे. नाट्या, नृत्य, संगीत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून हा स्फूर्तीदायक इतिहास उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. हा संपूर्ण इतिहास उपलब्ध पुराव्याच्या निकषावर पारखून घेतला आहे. केदार देसाई हे या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक आहेत. तसेच प्रणय तेली निर्माते आहेत.
बेळगावातील समस्त बंधूभगिनी आणि संघ-संस्थांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा आणि रक्तपेढी (ब्लड बँक) निर्माण करण्याच्या विधायक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नाटकाच्या देणगी प्रवेशिका खालील केंद्रांवर तसेच ऑनलाईन उपलब्ध आहेत. कट्टी फोटो सेंटर, देशमुख रोड, टिळकवाडी, शीतल रसवंतीगृह, काँग्रेस रोड, टिळकवाडी, खाऊ कट्टा, गोवावेस, टिळकवाडी, दरगशेट्टी कलर क्रिएशन्स, रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव. ऑनलाईन बुकिंगसाठी वर्तमानपत्राच्या जाहिरातीमधील QR code चा उपयोग करावा. स्कॅन केल्यानंतर hi असे टाईप करावे.
Home महत्वाची बातमी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ प्रस्तुत‘अयोध्या’एक महानाट्या, एक प्रेरणादायी गौरव गाथा
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ साऊथतर्फे दि. 9 आणि 10 मार्च रोजी मालिनी सिटी येथे सायंकाळी 6 वाजता ‘अयोध्या’ या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. अयोध्यानगरीत साकारलेले राम मंदिर हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नसून न्याय, मर्यादा, त्याग व तत्त्वनिष्ठा तसेच जीवनाचे सामाजिक भान याचे चिरंतर अधिष्ठान आहे. याची अनुभूती जनमानसाला व्हावी, हा या महानाट्याचा उद्देश आहे. […]