रोणापाल माऊलीचा २५ डिसेंबर रोजी जत्रोत्सव
प्रतिनिधी
बांदा
रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मध्यरात्री आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान उपसमितीतर्फे करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी रोणापाल माऊलीचा २५ डिसेंबर रोजी जत्रोत्सव
रोणापाल माऊलीचा २५ डिसेंबर रोजी जत्रोत्सव
प्रतिनिधी बांदा रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मध्यरात्री आरोलकर दशावतार […]