नंदीहळ्ळीत नरेगा योजनेंतर्गत रोहयो कामाला प्रारंभ

वार्ताहर /धामणे नंदिहळ्ळी ग्राम पंचायतच्यावतीने नरेगा योजने अंतर्गत रोजगार कामाची सुरुवात झाली आहे. ग्राम पंचायतच्या वतीने रोजगारांना दररोज काम मिळावे यासाठी प्रयत्नशील असून या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागेनहट्टी येथील स्मशानभूमीच्या शेजारून जाणाऱ्या मोठ्या नाल्याच्या खोदाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामी दररोज 50 ते 55 रोजगार काम करीत आहेत. याचप्रमाणे नंदीहळ्ळी परिसरातील खोदाईच्या कामाला […]

नंदीहळ्ळीत नरेगा योजनेंतर्गत रोहयो कामाला प्रारंभ

वार्ताहर /धामणे
नंदिहळ्ळी ग्राम पंचायतच्यावतीने नरेगा योजने अंतर्गत रोजगार कामाची सुरुवात झाली आहे. ग्राम पंचायतच्या वतीने रोजगारांना दररोज काम मिळावे यासाठी प्रयत्नशील असून या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागेनहट्टी येथील स्मशानभूमीच्या शेजारून जाणाऱ्या मोठ्या नाल्याच्या खोदाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामी दररोज 50 ते 55 रोजगार काम करीत आहेत. याचप्रमाणे नंदीहळ्ळी परिसरातील खोदाईच्या कामाला सुरुवात लवकरच होणार असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य नारायण पाटील यांनी दिली.