रोहितभाई, अभी नही तो कभी नही!
भारतीय क्रिकेटला मुंबईने भरभरून दिलयं. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, ते रोहित शर्मा. या सर्व दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला उच्च स्तरावर नेऊन सोडलयं. परंतु दुर्दैवाने आयसीसी वर्ल्ड कप च्या दोन फॉरमॅटमध्ये (तिसरा फॉर्मेट कसोटीचा तूर्तास बाजूला ठेवू.) कुठल्याच मुंबईकर कप्तानाला ट्रॉफीच चुंबन घेता आलं नाही. सहा महिन्यापूर्वी भारतात ती परिस्थिती आली होती. परंतु शेवटी आपण एक पाऊल मागे गेलो (नको त्यावेळी) आणि मुंबईकर रोहितची ती संधी हुकली.
सहा महिन्यापूर्वी भारतात ज्यावेळी वर्ल्ड कप चालू होता, त्यावेळी जवळपास हार्दिक पंड्या t20 साठी नेतृत्व करणार हे जवळपास पक्क झालं होतं. परंतु फिटनेसमुळे पंड्या बाहेर गेला. पुन्हा रोहितच t20 चे कर्णधार पद भूषवणार असा सूर उमटू लागला. आणि बघता बघता भारतीय क्रिकेट नियामक मंडळांने विश्वास दाखवला तो रोहित शर्मावर. आयसीसीच्या मोठ्या इव्हेंट मध्ये रोहित शर्माला बघायला मिळेल की नाही हे आता सांगण कठीणच आहे. अभी नही तो कभी नही हा त्याच्यासाठी स्लोगन (नारा ) राहिला नसून ती त्याच्यासाठी एक वस्तुस्थिती बनली आहे.
20 च्या बदलत्या खेळामुळे रोहित फलंदाजी कडे लक्ष केंद्रित करणार की कर्णधार पदाकडे?. हेही बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मोठे फटके मारायचे असतील तर ताकत फार महत्त्वाची गोष्ट असते. चेंडू सीमा रेषे बाहेर कसे भिरकवायचे तेही पदलालीत्याशिवाय ( फुटवर्क ) हे फक्त रोहित कडून शिकावं. 1981 82 मध्ये आणि 1983 वर्ल्ड कप चे प्रतिनिधित्व केलेले कीर्ती आझादने एका सामन्यात काही चेंडू फिरोजशहा मैदानाच्या बाहेर फेकले होते. ( आताचे जेटली मैदान ) त्यानंतर त्या काळात त्यांना षटकाराचा बादशहा म्हणून गौरवण्यात आले होते. त्यानंतर 1990 ते 2000 मध्ये अतुल बेदाडे षटकारांचा राजा झाला. सुदैवाने त्याची एक खेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम च्या आकाशवाणी समालोचन कक्षातून अनुभवता आली होती. परंतु त्यानंतर क्रिकेटचे तंत्र बदललं, क्रिकेटने कात टाकली आणि बघता बघता षटकार हा शब्द क्रिकेटमध्ये परवलीचा झाला.
याच षटकाराने 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला सलामीला पाठवले. आणि बघता बघता रोहित शर्मा चा खेळ कमालीचा उंचावला. आणि त्यानंतर त्याने मागे वळून कधीच बघितले नाही. नियती एखाद्यावर किती फिदा असावी त्याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. 2007 ते 2024 पर्यंत सर्व टी 20 मध्ये रोहितचा सहभाग. मागील विश्वचषक स्पर्धेत टी ट्वेन्टी कर्णधारपदाच मुकुट. आणि आता कर्णधार पदाचे काटेरी मुकुट एकंदरीत t20 विश्वचषका मधील 39 सामन्याचा विचार केला तर फक्त 963 धावा त्याच्या नावासमोर आहेत. क्रिकेटमध्ये आकडेच एखाद्या खेळाडूला रडवतात कधी हसवतात. हे कित्येकदा रोहितने अनुभवलय. काही दिवसांपूर्वी एका पोडकास्ट ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता की मागील काही वर्षांपासून
टी-20 मधील स्वरूप बदलले आहे. अर्थात आम्हालाही त्याच्याबरोबर बदलाव करावाच लागेल.
30 एप्रिल 1987 मध्ये नागपूर मध्ये जन्मलेल्या रोहित वर वयाच्या बाराव्या वर्षी मुंबईत नजर पडली ती दिनेश लाड सरांची. ख्रया अर्थाने त्यांनी त्याच्यावरती पैलू पाडले. गुरुदक्षिणा देण्याची ती घटिका जवळ आली आहे. ( काही महिन्यांपूर्वी ती आली होती हे विसरून चालता येणार नाही ) असो. भारतीय निवड समितीने रोहित वर पत्ते टाकलेत. अर्थात ते त्याला सर करायचे आहेत कुठल्याही तुरूपाशिवाय. बघूया रोहित गुरुनाथ शर्मा यांना हे आव्हान कितपत पेलवते याचे उत्तर 25 ते 30 दिवसात निश्चित मिळणार आहे. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं ठ रोहित भाई अभी नही तो कभी नही ठ!
Home महत्वाची बातमी रोहितभाई, अभी नही तो कभी नही!
रोहितभाई, अभी नही तो कभी नही!
भारतीय क्रिकेटला मुंबईने भरभरून दिलयं. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, ते रोहित शर्मा. या सर्व दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला उच्च स्तरावर नेऊन सोडलयं. परंतु दुर्दैवाने आयसीसी वर्ल्ड कप च्या दोन फॉरमॅटमध्ये (तिसरा फॉर्मेट कसोटीचा तूर्तास बाजूला ठेवू.) कुठल्याच मुंबईकर कप्तानाला ट्रॉफीच चुंबन घेता आलं नाही. सहा महिन्यापूर्वी भारतात ती परिस्थिती आली होती. परंतु […]