मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी रोहित संघाचा एक भाग नक्कीच असेल

आकाश अंबानी यावेळी म्हणाले की, तुम्ही चिंता करू नका, रोहित फलंदाजी करणार आहे. त्यामुळे रोहित आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो संघाचा एक भाग नक्कीच असेल. तो कर्णधार नसला तरी तो आमच्यासाठी एक फलंदाज नक्कीच आहे, असे आकाश यांनी यावेळी स्पष्ट …

मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी रोहित संघाचा एक भाग नक्कीच असेल

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून काढले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे. आकाश यांनी एका वाक्यात याबाबत सर्व काही स्पष्ट सांगितले आहे.

 

रोहितने मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वाधिक जेतेपदं जिंकवून दिली पण मुंबई इंडियन्सने फक्त एक पत्रक काढले आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढले. हार्दिक पंड्या हा आमचा पुढच्या वर्षासाठी कर्णधार असेल, असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यावर मुंबई इंडियन्सला चाहत्यांचा रोष स्विकारावा लागला. बऱ्याच चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडून दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले पण रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती पण या प्रकरणावर आता मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी आपले मौन सोडले आहे.
 

आकाश यांनी एका वाक्यात या सर्व प्रकरणावर पडदा टाकल्याचे समोर आले आहे. रोहितला पायउतार केल्यावर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या लिलावात सहभागी झाली होती. त्यावेळी आकाश आणि नीता अंबानी हे दोघेही तिथेच होते. या लिलावात मुंबईचा संघ खेळाडूंवर बोली लावत असताना एक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चाहत्यांनाही लिलाव लाइव्ह पाहण्याची संंधी दिली होती. चाहते लिलावाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी एक चाहती लिलाव सुरु असताना ओरडली की, रोहित शर्माला परत आणा. त्यावर आकाश अंबानी यांनी एका वाक्यात हा विषय संपवला. आकाश अंबानी यावेळी म्हणाले की, तुम्ही चिंता करू नका, रोहित फलंदाजी करणार आहे. त्यामुळे रोहित आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो संघाचा एक भाग नक्कीच असेल. तो कर्णधार नसला तरी तो आमच्यासाठी एक फलंदाज नक्कीच आहे, असे आकाश यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा कोणताही पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

Go to Source