रॉजर स्पोर्ट्स, कर्नाटक स्टार स्पोर्ट्स विजयी

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी रॉजर स्पोर्टस इंडियन बॉईज असंगाचा तर कर्नाटका स्टार स्पोर्ट्स असंगाने अर्जुन स्पोर्ट्स पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळवले. विनीत पाटील व साथक गुंजाळ यांना सामनावर पुरस्कार देण्यात आला. […]

रॉजर स्पोर्ट्स, कर्नाटक स्टार स्पोर्ट्स विजयी

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी रॉजर स्पोर्टस इंडियन बॉईज असंगाचा तर कर्नाटका स्टार स्पोर्ट्स असंगाने अर्जुन स्पोर्ट्स पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळवले. विनीत पाटील व साथक गुंजाळ यांना सामनावर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथे खेळविण्यात झालेल्या सामन्यात इंडियन बॉईज अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 29.3 षटकात सर्व गडी बाद 148 धावा केल्या. त्यात सागर शिंगविने 4 षटकार 6 चौकारांसह 69, करण येळगुळकरने 5 चौकारासह 31 धावा केल्या. रॉजर क्रिकेट क्लबतर्फे वीरेश गौडरने 28 धावात 3, उमेश गोरलने 2, तर सुनील पाटील व विनीत पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.प्रत्युत्तरादाखल  खेळताना रॉजर्स क्रिकेट क्लबने 18.4 षटकात 2 गडी बाद 149 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला.  विनीत पाटील 7 चौकारांसह नाबाद 57, तरुण कांबळेने 2 चौकारांसह 28, अक्षय बिदरहलीने 2 चौकारांसह 27, तर सुमितने धावा केल्या. इंडियन बॉइज तर्फे करण व आरिफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात झालेल्या सामन्यात कर्नाटका स्टार स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 6 गडी बाद 251 धावा केल्या. त्यात साथक गुंजाळने 3 षटकार 10 चौकारासह 78, विराज हवेलीने 8 चौकारांसह 41, अनमोल पागतने 4 चौकारांसह 38, ऋषी गुडीमनी 6 चौकारासह 36 तर मदन कुमारने 25 धावा केल्या, अर्जुन स्पोर्ट्स तर्फे मिरेंद्र सिंग भाटीने 3, सिद्धांतने 2  तर अक्षय 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाचा डाव 19.3 षटकात सर्व गडीबाद 60 धावा आटोपला. त्यात मिरेंद्रसिंग भाटियाने 19 धावा केल्या. स्टार स्पोर्ट्सतर्फे विराज हावेरी, रमेश बागवान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.