पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा; मुंब्र्यातून एका संशयिताला अटक

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंब्र्यातून एका संशयिताला अटक केली असून आरोपीचे नाव खुम्मा दिलबहादूर शाही (वय 40, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असून तो खेडकर …

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा; मुंब्र्यातून एका संशयिताला अटक

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंब्र्यातून एका संशयिताला अटक केली असून आरोपीचे नाव खुम्मा दिलबहादूर शाही (वय 40, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असून तो खेडकर यांच्या बंगल्यावर नुकताच कामाला ठेवलेल्या नौकराचा वडील असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ALSO READ: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, सुळेही केंद्रात मंत्री होणार नाहीत, अजित पवारांचे पुण्यात मोठे विधान

पूजा खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या हिकमत याने हा दरोडा रचून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. 

ALSO READ: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बंगल्यात आई-वडिलांना बेशुद्ध करून मोठी लूट

शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याचा सुमारास आरोपी हिकमतने पूजाच्या आई-वडील, रखवालदार, स्वयंपाकी, वाहनचालकाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्द्ध करून घरात दरोडा टाकला. दरोडा टाकताना पूजा समोर आल्याने आरोपीने पूजा यांचे हातपाय चिकटपट्टीने बांधून घरातील दागिने, रोख रक्कम, घरातील इतर साहित्य घेऊन पसार झाला 
 

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर या दरोड्यात एकूण सात संशयित आरोपी दिसून आले. या प्रकरणांनंतर तपासाला वेग आला.

ALSO READ: ‘आमची मैत्रीपूर्ण लढत होती, पण अजित पवारांचा संयम ढळत आहे’, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले मोठे संकेत

तपासादरम्यान मुख्य संशयित हिकमतचा शोध घेत असताना त्याचे वडील खुम्मा शाही हे मुंब्र्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी खुम्मा शाही यांना ताब्यात घेतले.

 

सध्या खुम्मा शाही यांची सखोल चौकशी सुरू असून, या दरोड्यामागील सूत्रधार कोण आहे, चोरीचा माल कुठे नेण्यात आला आहे तसेच इतर आरोपींची भूमिका काय आहे, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, घरगुती नोकरांची पार्श्वभूमी तपासण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Edited By – Priya Dixit 

Go to Source