मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक चालकावर हल्ला करून लुटणाऱ्यांना अटक
9 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याला कडेला थांबलेल्या ट्रक चालकावर काही हल्लेखोरांनी हल्ला करत धमकावून मारहाण केली. नंतर दरोडेखोरांनी ट्रक चालकाचे दोन मोबाईल आणि 23 हजार रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
आरोपींकडून मोबाईल फोन आणि रोख रकमेसह 48 हजार रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली आहे.
पाच आरोपींना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरातून अटक केली आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. पाच आरोपींना अटक केली असून सुमारे 48 हजाराचा चोरीचा माल जप्त केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit