बेतोडा-बोरी बगलमार्गावर कुर्टी येथे रस्त्यावर दरड कोसळली
फोंडा : बतोडा-बोरी बगलमार्गावरील कुर्टी येथील सहकारी पेट्रोलपंपजवळ रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना काल बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. फोंडा वाहतूक पोलिसांनी तात्काळ या घटनेचा आढावा घेतला.वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी येथे वाहतूक होमगार्ड तैनात करण्यात आले. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली. बेतोडा-बोरी बगलमार्गाचे भर पावसात जेसीबीद्वारे डेंगर कापण्dयाचे काम सुरू आहे. वळणावरील रस्त्यावर कोणतेही सुरक्षेची उपाययोजनेचे नियम न पाळता काम सुरू आहे. भर पावसात डेंगराळ भाग पोखरून नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण देऊ नये तसेच दरड कोसळण्यामागे कंत्राटदाराला जबाबदार धरावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी बेतोडा-बोरी बगलमार्गावर कुर्टी येथे रस्त्यावर दरड कोसळली
बेतोडा-बोरी बगलमार्गावर कुर्टी येथे रस्त्यावर दरड कोसळली
फोंडा : बतोडा-बोरी बगलमार्गावरील कुर्टी येथील सहकारी पेट्रोलपंपजवळ रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना काल बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. फोंडा वाहतूक पोलिसांनी तात्काळ या घटनेचा आढावा घेतला.वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी येथे वाहतूक होमगार्ड तैनात करण्यात आले. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली. […]