विजयनगर साई मंदिरशेजारील रस्त्याची दुर्दशा; दुरुस्तीची मागणी

बेळगाव : विजयनगर पाईपलाईन येथील साई मंदिरसमोर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्ता पूर्णपणे खचल्याने ये-जा करणे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गानजीक विजयनगर प्रवेशद्वारावरच ही समस्या निर्माण झाल्याने वाहनधारकांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तातडीने ही समस्या मार्गी लावून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून पाईपलाईन रोडमार्गे चढतीला जाणाऱ्या रस्त्याचीच दुर्दशा […]

विजयनगर साई मंदिरशेजारील रस्त्याची दुर्दशा; दुरुस्तीची मागणी

बेळगाव : विजयनगर पाईपलाईन येथील साई मंदिरसमोर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्ता पूर्णपणे खचल्याने ये-जा करणे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गानजीक विजयनगर प्रवेशद्वारावरच ही समस्या निर्माण झाल्याने वाहनधारकांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तातडीने ही समस्या मार्गी लावून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून पाईपलाईन रोडमार्गे चढतीला जाणाऱ्या रस्त्याचीच दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील सिमेंट आणि डांबर उखडून गेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविणे जिकिरीचे बनू लागले आहे. वाहने घसरत असल्याने जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधित लोकप्रतिनिधी आणि ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट बनू लागली आहे. त्यामुळे मंदिराशेजारील या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.