Road Accident: कंटेनर आणि कारच्या अपघातात पाच तरुणांचा दुर्देवी मृत्यू
नाशिकच्या मनमाड -येवला राज्यमार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघात पाच तरुणांचा जागीच दुर्देवी अंत झाला. नाशिकच्या मनमाड येवला राज्यमार्गावर अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर कंटेनर आणि भरधाव येणाऱ्या कारची धडक झाली या अपघातात कार मध्ये बसलेले पाचही तरुणांचा दुर्देवी अंत झाला. या धडकेत कारचा चुराडा झाला. तरुणाचे मृतदेह स्थानिकांनी कार मधून बाहेर काढले.
ललित शरद सोनवणे, गणेश शरद सोनवणे, रोहित धनवटे, श्रेयस धनवटे आणि प्रतिक नाईक अशी मृतांची नावे आहेत. हे तरुण नाशिकात राहणारे असून मनमाडच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थानी दर्शनास गेले होते. नाशिकला परतताना रस्त्याच्या मधोमध हा हा भीषण अपघात झाला. मृतदेह मनमाडच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit