छठ पूजा : प्रसाद करिता बनवा तांदळाचे लाडू

साहित्य- दोन कप तांदूळ तीन कप पिठीसाखर अर्धा कप तूप आवश्यकतेनुसार सुका मेवा

छठ पूजा : प्रसाद करिता बनवा तांदळाचे लाडू

साहित्य-

दोन कप तांदूळ

तीन कप पिठीसाखर

अर्धा कप तूप

आवश्यकतेनुसार सुका मेवा 

 

कृती-

तांदळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ दोन ते तीन तास भिजत ठेवावे आणि नंतर पाणी गाळून घ्यावे. यानंतर हा तांदूळ स्वच्छ ठिकाणी उन्हात वाळवावे. तांदूळ पूर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ठेवून बारीक वाटून घ्यावे. आता कढईत अर्धा तूप घालून त्यामध्ये हे मिश्रण परतवून घ्यावे.आता त्यात साखर घालावी. व सुकामेवा घालावा. थोडे पाणी घालावे. आता हे मिश्रण छान प्रकारे एकत्रित करून याचे लाडू वळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले तांदळाचे लाडू रेसिपी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik